घरगुती सोलर
तुमच्या घरासाठी स्मार्ट सिस्टीम, कमी वीज बिल आणि सबसिडीसह दीर्घकालीन बचत.
घर, उद्योग आणि शेतीसाठी स्मार्ट सोलर सोल्यूशन्स — कमी वीज बिल, जास्त बचत आणि वर्षानुवर्षांचा विश्वास.
तुमच्या घरासाठी स्मार्ट सिस्टीम, कमी वीज बिल आणि सबसिडीसह दीर्घकालीन बचत.
ऑफिस, कारखाने आणि संस्थांसाठी खर्च कमी करणारे उच्च कार्यक्षमतेचे उपाय.
शेतीसाठी अधिक विश्वासार्ह पाणीपुरवठा, कमी अवलंबित्व आणि अधिक कार्यक्षमता.
तुमचे मासिक वीज बिल भरा आणि तुमच्यासाठी योग्य सोलर क्षमतेचा प्राथमिक अंदाज मिळवा.
योग्य सिस्टीम निवडण्यापूर्वी उपयुक्त माहिती, ग्राहक अनुभव आणि बचतीच्या कथा जाणून घ्या.
साईट सर्वे, योग्य क्षमता आणि नेट-मीटरिंगच्या मदतीने एका कुटुंबाने मासिक वीज खर्चात मोठी घट अनुभवली.
तुमच्या वापर, जागा आणि वीजपुरवठ्याच्या पॅटर्ननुसार योग्य सोलर प्रकार निवडण्याचे सोपे मार्गदर्शन.
प्रारंभीची गुंतवणूक, सबसिडी, पेबॅक आणि दीर्घकालीन बचत यामागचे सोपे गणित समजून घ्या.
ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे घर आणि पक्के छत आहे, आणि ज्यांचे चालू वीज बिल त्यांच्या नावावर आहे, ते सर्व या योजनेसाठी पात्र आहेत.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि नेट-मीटर बसल्यानंतर साधारण ३० दिवसांच्या आत सबसिडीची रक्कम थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होते.
बहुतेक उच्च दर्जाचे सोलर पॅनेल्स २५ ते ३० वर्षांच्या परफॉर्मन्स वॉरंटीसह येतात. योग्य काळजी घेतल्यास ते त्याहून अधिक काळ म्हणजे ४० वर्षांपर्यंत उत्तम टिकू शकतात.
नेट मीटरिंग म्हणजे तुमची सिस्टीम जास्त वीज तयार करत असेल, तर ती महावितरणला पाठवली जाते. आणि जेव्हा सोलर काम करत नाही (रात्री), तेव्हा तुम्ही महावितरणकडून वीज घेता. याचे गणित बिलात आपोआप ऍडजस्ट होते.
होय, अनेक राष्ट्रीय आणि खाजगी बँकांद्वारे सुलभ EMI सुविधा आणि कमी व्याजदरात सोलर फायनान्सिंग उपलब्ध आहे. आम्ही कर्ज प्रक्रियेत पूर्ण मदत करतो.
होय, ढगाळ वातावरणात आणि पावसाळ्यातही सोलर काम करतो, फक्त वीज निर्मितीचे प्रमाण उन्हाळ्याच्या तुलनेत थोडे कमी असते. मात्र, नेट मीटरिंगमुळे तुमची वर्षाची सरासरी वीज गरज सहज भागवली जाते.
आम्हाला तुम्हाला अचूक आणि योग्य कोटेशन देण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते. यामुळे वेळेची बचत होते आणि काम लवकर सुरू करता येते.
तुमच्या कुटुंबाचा किंवा व्यवसायाचा नेमका वीज वापर समजण्यासाठी आणि योग्य क्षमतेची सिस्टीम ठरवण्यासाठी.
तुमच्याकडे किती मोकळी जागा आहे? १ किलोवॅटसाठी साधारण १०० चौ. फूट (Sq. Ft.) जागा लागते.
पॅनेलवर झाडांची किंवा शेजारच्या इमारतीची सावली पडत नाही ना, याची खात्री करा.
चला तर मग, आजच संपर्क करा आणि तुमची मोफत साईट सर्वे व्हिजिट बुक करा.
मोफत साईट सर्वेसाठी आजच संपर्क करा! तुमचे मासिक वीज बिल आणि छतावरील उपलब्ध जागा लक्षात घेऊन, आम्ही अचूक आराखडा तयार करून देऊ.